पंढरीबापू देशमुख विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Shabd Sandesh
0

तांदूळनगरी प्रतिनिधी महागाव ::- नवोदय शिक्षण संस्था महागाव द्वारा संचालित पंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येरंडी महागाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.नुकताच ०५ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये पंढरीबापू देशमुख कला महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के, विज्ञान विभागाचा १०० टक्के तर सनशाइन इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या १००%टक्के निकाल लागला असून यामध्ये कला विभागामधून प्रथम हिमेश चचाने (७५.३३%), द्वितीय दामिनी उपरीकर (६८.६७%), तृतीय प्रज्ञा गोंडाने (६५%), विज्ञान शाखेमधून प्रथम श्रावणी चौधरी (८२.१७%), द्वितीय हर्षल हेमने (७८.८३%), तृतीय मंजिरी पत्रे (७७.८३%), इंग्रजी माध्यम प्रथमअथर्व कुथे (८४.३३%), द्वितीय संकेत शेंडे (७९.८३%) तृतीय अन्वेस दिघोरे (७८.५०%) गुण प्राप्त केले.विद्यालयाच्या वतीने प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एच एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य जे.के.कालसर्फे,आनंदे सदस्य नवोदय शिक्षण संस्था महागाव, एस.डी.मल्लीक सेवानिवृत्त पर्यवेक्षक,बनसोड पर्यवेक्षक,पल्लवी भजने प्राचार्य,यांच्यासोबत पेढे वाटून सत्कार सोहळा करण्यात आला आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)