शब्दसंदेश न्यूज देवरी,११ जून २०२५
हवामान विभागाने इतर शहराप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातही वादळासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आकाशातील शीत ढगांमुळे सोमवारी रात्री चांगला पाऊस होईल असाही अंदाज होता. मात्र ते शीत ढग व पाऊसही वाऱ्याने उडून गेला. पावसाच्या गारवा मिळत नसून तीव्र उष्णतेने जिल्हावाशीयांचा जीव गुदमरायला लागला आहे.
मंगळवारी दिवसभर आकाशात ढगांची गर्दी होती. मात्र, त्या ढगांमधून सूर्याची किरणे तीव्र चटके देत होती. ढगाळ वातावरण असूनही घराबाहेर उन्हाच्या झळा बसल्याचा अनुभव येत आहे. ढगांमुळे सोमवारच्या ४२ अंशावरून पारा थोडा खाली आला. पण नोंद ४३ झाली. जी सरासरी पेक्षा अधिक आणि तीव्र होती. दुसऱ्या दिवशीही गोंदिया चे तापमान महाराष्ट्रात जास्तच होते. पाऊस येत नसल्याने तापमान काही खाली येत नाही. आणि दम घोटणारा उखाणा काही केल्या कमी होत नाही. सूर्यास्तानंतर उखाड्याचा तास कायम होता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १४ जून नंतर पूर्व आणि मध्य भारतात मान्सून सक्रिय होण्याची व ढगांमधून आनंद सरी बरसण्याची शक्यता आहे. सध्या छत्तीसगडमध्ये वरच्या हवेतील चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. तसेच उत्तर प्रदेश मधून मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि बंगालचा उपसागरापर्यंत एक ट्रॅप रेषा तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भाच्या आकाशात आद्रता प्रवेश करत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणासह एक-दोन ठिकाणी हलका पाऊस देखील पडत आहे. मात्र या ढगांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यासारखी क्षमता नाही हवामान विभागाच्या मते दोन दिवस तापमान 40° च्या आसपास राहील आकाशात ढग आच्छादित असल्याने हलका पाऊस देखील सुरू राहील रात्री चांगल्या पावसाचा अंदाज असताना, गोंदिया जिल्ह्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस पडला आहे.
गोंदिया जिल्हावाशीयांचे येरे येरे पावसा
जिल्ह्यातील नागरिकांना दमट उष्णतेचा त्रास होत आहे. जून चे पहिले दहा दिवस निघून गेले आहेत. पण मुसळधार पावसाची वाट पाहणे सुरूच आहे. मान्सूनच्या हालचाली थांबल्या आहेत, अशा परिस्थितीत जिल्हावाशीय मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. फक्त चांगला पाऊसच कडक उन्हापासून दिलासा देऊ शकतो. मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली ही कमजोर पडले आहेत.