अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाची दर्जेदार धाड कारवाई

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.११जून

        पो. ठाणे रामनगर अंतर्गत वसंतनगर  येथे कारवाई करत पथकाने आरोपी मुकेश सुदर्शन भारती, राकेश यादोराव देवरे दोन्ही रा. देवरी यांना अवैधरित्या गांजा बाळगून वाहतूक करताना पकडून त्यांचेकडून एकुण ९९७ ग्रॅम हिरवा ओलसर गांजा किंमती १९९४०/-, स्कूल बॅग किमती ५००/ रुपये, एक मोटर सायकल किमती ८००००/- रुपये  असा एकुण किंमती १,००,४४०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
   पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे , अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत.
    आज दिनांक ११ जून २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय  खात्रीशिर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  पोलीस स्टेशन रामनगर अंतर्गत वसंतनगर परिसरात अंमली पदार्थ गांजा बाळगून वाहतूक करणाऱ्या व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई केलेली आहे. आरोपी नामे मुकेश सुदर्शन भारती वय ४५ वर्षे रा. मस्कऱ्या चौक, देवरी, राकेश यादोराव देवरे  वय ४५ वर्षे रा. संजयनगर देवरी यांना खात्रीशीर माहितीच्या आधारे बसंतनगर ते बी. एच. जे. जाणाऱ्या रोडवर  प्रतिष्ठित पंचासमक्ष पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत त्यांचे कडे असलेल्या एका आकाशी रंगाच्या स्कूल बॅग मध्ये  ९९७ ग्रॅम ओलसर, पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किंमती १९९४० /- रुपये तसेच स्कूल बॅग किमती 500/ रुपये, एक मोटर सायकल किमती ८००००/- रुपये  असा एकुण किंमती १,००,४४०/-  रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तो पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करून सदर संबंधात दोन्ही आरोपी यांना विचारपूस केली असता मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा हे गोविंद अग्रवाल रा. बसंतनगर गोंदिया यांचेकडून विकत घेतल्याचे सांगितल्याने नमूद तिन्ही आरोपी  मुकेश सुदर्शन भारती  राकेश यादोराव देवरे गोविंद अग्रवाल  यांचे विरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे सपोनि धीरज राजूरकर, स्थागुशा  गोंदिया यांचे तक्रारी वरून एन. डी.पी. एस. कायद्याचे कलम ८ (क), २०,२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस ठाणे रामनगर पोलीस करीत आहेत.
                  
       सदरची दर्जेदार धाड कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सपोनि राजूरकर, मपोउपनि वनिता सायकर, पोउपनि शरद सैदाने, अंमलदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख,  दीक्षितकुमार दमाहे, दुर्गेश तिवारी, संजय चौहान, सुबोध बिसेन, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, छगन विठ्ठले, कुमुद येरणे, स्मिता तोंडरे, लक्ष्मण बंजार, राम खंदारे  यांनी कारवाई केलेली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)