नवीन नंबर प्लेटसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Shabd Sandesh
0

वाढीव मुदतीमुळे वाहनधारकांना दिलासा

शब्दसंदेश न्यूज गोंदिया : केंद्र सरकारने एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य केले असून ३० जून पर्यंत शेवटची मुदत दिली होती. त्यामुळे गोंदियाकरांनी एचएसआरपी ऑनलाईन नोंदणीसाठी घाई सुरु केली होती. मात्र, राज्यातील वाहनांची संख्या आणि नोंदणी करण्याचे प्रमाण लक्षात घेता आता दिड महिन्यांची मुदत दिली गेलयाने वाहन धारकांना मोठा दिलासा मिळला आहे. वाहन धारक १५ ऑगस्ट पर्यंत नवीन नंबर प्लेटसाठी ऑनालाईन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र शासनाने जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवली आहे. आता १ एप्रिल

२०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी ही प्लेट बसविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ निश्चीत करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून यावेळी स्पष्अ करण्यात आले आहे की, ही मुदत अंतिम असून यापूढे मुदत वाढविली जाणार नाही. त्यानंतर एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. यापूर्वी राज्य सरकारने तीनदा मुदत वाढ दिली आहे. ३१ मार्च, ३० जून, आणि नंतर १ जुलै पर्यंत नंबर प्लेटची ऑनलाईन नोंदणी करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. तरीही ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांचा वेग वाढत नव्हता. त्यामुळे राज्य शासनाला अंतिम मुदत देऊन दंडात्मक कारवाइच पवित्रा घ्यावा लागला आहे.

बुकिंगसाठी धडपड

१५ ऑगस्ट नंतर नवीन नंबर प्लेअ नसणाऱ्या वाहनांवर १ हजार ते १० हजारांपर्यंत दंडात्म कारवाई करण्यात येणार आहे. ३१ जुलै ही मुदत जवळ येत असतानाच गोंदियाकरांनी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंगसाठही धडपड सुरु केली होती. अनेकांनी नेअ कॅफे किंवा खासगी केंद्रावरुन बुकिंगसाठी घाई सुरु केली होती. मात्र आता राज्य शासनाने अंतिम मुदत वाढ केल्यामुळे गोंदियाकरांना दिलासा मिळाला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)