दल्ली येथे रंगीत संगीत शेतीशाळा; महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज सडक अर्जुनी, दि.२६ :

कृषी विभागाच्या वतीने राज्यात शेती शाळेचे आयोजन केले जात आहे. शेती शाळेमध्ये ३० शेतकऱ्यांची निवड करून शेतीशाळा राबविली जात आहे. त्या अनुषंगाने २४ जून रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम दिल्ली/ख. अंतर्गत येणाऱ्या कृषी सहा. कार्यालय मार्फत महिलांची रंगीत संगीत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले.
शेती शाळेमध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बियाणे पेरणी, पिकांमधील आंतर मशागत, रोग व किडी ची ओळख, मित्र कीड व शत्रू कीड यांची ओळख पीक संरक्षण व तसेच पिकाची कापणी व साठवणूक या सर्व बाबींवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी राजशेखर राणे यांनी विशेष महिलांची रंगीत संगीत शेती शाळा राबवण्याचे ठरवले. त्यामध्ये ३० महिलांची निवड करून दोन गटांमध्ये पंधरा-पंधरा महिलांची विभागणी करून महिलांचे हिरवा व लाल असे दोन गट शेती शाळेसाठी निवडण्यात आले. त्यामध्ये महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दाखवला व शेती शाळेचा दुसरा वर्ग यशस्वी राबवला. या शेती शाळेमध्ये प्रत्यक्ष सहाय्यक कृषि अधिकारी राजशेखर राणे यांनी सुद्धा महिला शेतकरी यांच्या सह शेतावर भात बियाणे गादीवाफा पद्धतीने लागवड प्रात्यक्षिकात भाग घेतला. यावेळी महिला शेतकर्यांचे शेती शाळेत मनोरंजनासाठी पासिंग बॉल हा सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान विजयी महिला शेतकऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी उपकृषी अधिकारी रजनीश पंचभाई, ग्राम विस्तार अधिकारी पटणे, शुभम मेश्राम, ईशान खेडकर, सरपंच रेखा परतेकी, शालु परतेकी, हेमलता मंडारी, गीता करचाल, विद्या चनाप, सत्यभामा चनाप, शालिनी राऊत, मीना राऊत, उर्मिला राऊत, गायत्री चौधरी, आदी महिलांनी सहभाग नोंदवला. सरपंच रेखाताई परतेकी व दोन्ही महिला शेतकरी गटप्रमुख यांनी उपस्थित शेतकर्यांचे गावकऱ्यांचे कर्मचारी अधिकरी यांचे आभार मानून शेती शाळेच्या पहिल्या वर्गाची सांगता केली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)