"पप्पा मला चॉकलेट द्या! द्या ना हो...पप्पा मला चॉकलेट द्या" चॉकलेट मागणाऱ्या चिमुरडीला जन्मदाताने दिला गळफास

Shabd Sandesh
0
उदगीर तालुक्यातील भीमा तांडा गावातील घटना 
शब्दसंदेश न्यूज उदगीर, दि.३०:
    
    "पप्पा मला चॉकलेट द्या! द्या ना हो... पप्पा मला चॉकलेट द्या" करणाऱ्या पोटच्या गोळ्याला निष्ठुर बापाने साडीने गळफास देऊन खून केला. चार वर्षाच्या चिमुरडीने पित्याकडे चॉकलेट मागितले. लेकराने चॉकलेटचा आग्रह केल्याने बापाचा राग अनावर झाला आणि त्या निष्ठूर पित्याने लेकीचा साडीने फाशी देऊन खून केला. माणुसकीला काळीमा फासणारी आणि बाप लेकीच्या गोड नात्याला कलंक लावणारी ही उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे निर्दयी बाप बालाजी बाबू राठोड (वय ३६ वर्ष) याला त्याच्या ४ वर्षीय मुलगी आरुषीने खाण्यासाठी चॉकलेट मागितले. तिने चॉकलेटचा आग्रह केल्याने पित्याला रागआला. या रागातूनच त्याने त्या चिमुरडीला घरातील साडीने फाशी देवून हत्या केली. निर्दयी पित्याने पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना समजताच परिसरात खळबळ माजली.
    रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. घटना घडताच चिमुकलीची आई वर्षा बाबू राठोड हिने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत आपल्या चार वर्षीय मुलीने खाण्यासाठी चॉकलेट मागितले, याचा राग आल्याने पती बाबु राठोड याने मुलगी आरुषी हिला साडीने गळफास देऊन खून केल्याचे म्हटले आहे.
     चिमुकलीची आई वर्षा राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आरोपी-पिता बालाजी बाबु राठोड यास अटक केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)