तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्याची घटना
शब्दसंदेश न्यूज
औषधी बनविणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात रासायनिक भट्टीच्या स्फोट झाल्याची भयंकर घटना सोमवारी घडली. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्याची फार्मास्युटिकल कंपनीच्या कारखान्यात घटना घडली आहे. यात दहा कामगाराचा मृत्यू झाल्या असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहीजन ढीगार्याखाली दबले गेले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सीघाची इंडस्ट्रीजचे तेलंगणातील पाशमैलारममध्ये रासायनिक कारखाना आहे सकाळी साडेनऊच्या सुमाराशी घटना घडली. कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच वेगवेगळ्या अग्निशामक दलाच्या केंद्रावरून बंब पाठवण्यात आले. त्याचबरोबर एनडीआरएफ, डीआरएफ आणि एसडीआरएफची पथके बोलवण्यात आली.
दहा जणांचा मृत्यू
रासायनिक कंपनीत झालेला स्पोर्ट इतका भीषण होता की संपूर्ण बिल्डिंग खाली कोसळली स्फोटाच्या तीव्रतेने आजूबाजूलाही हादरे जाणवले. या घटनेत १० कामगारांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण प्रशासनाकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर काहीचा रुग्णालयात नेतांना आणि नेल्यानंतर मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की २० ते २६ लोक या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. काही जण ढिकाऱ्याखाली दबले गेले आहेत. त्यामुळे वेगाने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मल्टीझोन २ चे आयजी सत्यनारायण यांनी सांगितले की, या घटनेत एकूण आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. सहामृतदेह घटनास्थळी आढळून आले आहे. त्याचबरोबर २६ जण जखमी झाले आहेत.