हरदोना (बु.) येथील धक्कादायक घटना; दोघांनाही घेतले ताब्यात
शब्दसंदेश न्यूज राजुरा, दि.०१
पत्नीला मारहाण करणाऱ्या लहान भावाला समजविण्यासाठी गेलेल्या मोठा भाऊ व वडिलांना लहान भाऊ जुमानत नसल्याचे पाहून मोठ्या भावाने त्याचा गळा आवळला व याच वेळी वडिलांनी त्याचे हातपाय बांधले. गळा जोरात आवळल्या गेल्याने लहान भावाचा दवाखाण्यात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतकाचा मोठा भाऊ व वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदर घटना राजुरा तालूक्यातील हरदोना (बू.) येथे शनिवार २८ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. प्रदिप मनोहर चिलमूले (२४) असे मृतकाचे नाव असून मनोहर चिलमूले (५०) व प्रफुल मनोहर चिलमूले (३०) असे आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार हरदोना (बु.) येथे राहणारे मनोहर चिलमूले हरदोना (बु.) येथील धक्कादायक घटना, दोघांनाही घेतले ताब्यात यांना तीन मुले आहेत. दि. २८ जून रोजी रात्री ९ वाजता च्या दरम्यान प्रदीप हा आपल्या पत्नीसोबत भांडण करून तिला मारहाण करीत होता. त्याचा मोठा भाऊ प्रफुल चिलमुले हा त्याचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेला असता प्रदीप चितमूले यांनी त्याला काठीने हातावर मारले. त्यामुळे त्याचे वडील मनोहर चिलमुले हे मध्यस्थी करिता गेले. प्रदीप चिलमुले हा दोघांनाही ऐकत नसल्याने प्रफुल चिलमुले यांनी त्याला खाली पाडून हाताने गळा दाबून ठेवला व त्याचे वडील मनोहर चिलमुले हे घरातील दोरी आणून त्याचे हात बांधत असताना प्रफुल चिलमूले यांनी प्रदीपचा गळा दाबून ठेवल्याने प्रदीप हा अचानक बेशुद्ध पडला. त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक सुमित परतेकी ह्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते पुढील तपास करीत आहे.