बैलगाडीसह शेतकरी नाल्याच्या पाण्यात बुडाला

Shabd Sandesh
0
शेतकरी व एका बैलाचा मृत्यू: दहेगावची घटना

शब्दसंदेश न्यूज वडकी (यवतमाळ), दि.२६ :  

बैलगाडी सह शेतकरी नाल्याच्या पाण्यात बुडाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील दहेगाव गावालगत बुधवारी (दि. २५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात शेतकरी आणि एका बैलाचा मृत्यू झाला आहे. राजू किसन रोकडे (५६, रा. दहेगाव) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. 
    शेतकरी बुधवारी बैलांना पाणी पाजण्यासाठी नाल्यावर गेला होता. दरम्यान, बैलगाडीला मागे बांधून असलेला गोऱ्हा अचानक उधळला. त्यामुळे बैलगाडीला जुंपून असलेले बैल सैरावैरा पळत थेट नाल्याच्या पाण्यात घुसले. त्यामुळे शेतकरी बैलगाडीसह पाण्यात बुडाला. यात शेतकरी आणि बैलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी वडकी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील रुग्णालयात पाठविला. मृतक शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहेत. या घटनेबद्दल वडकी गावात शोककळा पसरली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)