नृत्याच्या कार्यक्रमात घडलेली घटना; मित्रावर विनयभंगाच गुन्हा दाखल
शब्दसंदेश न्यूज हिंगोली, दि.२४
एका पॅलेस मध्ये डान्सच्या कार्यक्रमासाठी विदर्भातून आलेल्या मैत्रिणीसोबत अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग व शरीर सुखाची मागणी करणाऱ्या तरुणा विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी उशीरा गुन्हा दाखल झाला. यामध्ये पोलिसांनी त्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका पॅलेस मध्ये २२ जून रोजी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विदर्भातील रिलेशनशिप मधील एक २९ वर्षीय तरुणी तिचामित्र राजेश उंटवाल याच्या सोबत आली होती. रात्री ७ वाजता सदर कार्यक्रम सुरु झाला होता. या कार्यक्रमाच्या वेळी पुसद येथील राजेश उंटवाल याने तिच्या मैत्रिणीला नृत्याच्या कार्यक्रमातून बाहेर ओढत नेऊन तिच्यासोबत अश्लिल चाळे सुरु केले होते. यावेळी त्याच्या मैत्रिणीने त्याला विरोध केला असतांना तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या शिवाय मैत्रिणीकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला विरोध केला असता मैत्रिणीस धक्काबुक्की करून ढकलून दिले. यामुळे त्याच्च्या मैत्रिणीने थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले. यामध्ये राजेश सोबत ती रिलेशनशिपमध्ये राहत आहे. एका नृत्य कार्यक्रमासाठी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर भर कार्यक्रमातुन राजेश याने आपल्या मैत्रिणीस बाहेर नेऊन तिच्यासोबत अश्लिल चाळे करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजेश उंटवाल याच्या विरुध्द विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे, जमादार शंकर गायकवाड यांच्या पथकाने तातडीने राजेश यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत.