दिग्रस, दि.२४
नाशिक येथे काळीज माझं साहित्य सामाजिक संस्था छत्रपती संभाजी नगरच्या वतीने भव्य दिव्य राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित केले होते. प्राइड बेस्ट बँक्वेट हॉल नाशिक येथे राज्यस्तरीय कवी संमेलन नुकतेच संपन्न झाले.
संस्थेच्या संचालिका आदरणीय सुरेखा ताई बेंद्रे संमेलनाध्यक्ष प्रा .चंद्रकांत वानखेडे व्याख्याते, कवी, संपादक,उद्घाटक राधिकाताई मखामले निराधार व निराश्रीत प्रदेशाध्यक्ष पुणे, स्वागताध्यक्ष गुलाबराजा फुलमाळी *अभिनेता* कवी, संपादक, पुणे, समाज सेविका शारदाताई भामरे नाशिक,डॉक्टर भास्कर म्हरसाळे ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते नाशिक, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दिग्रस येथील शीघ्र कवी उत्तमराव केशवराव मनवर गुरुजी टोपीवाले यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि मानाचा फेटा देऊन गौरव करण्यात आला.
कवी उत्तमराव मनवर यांनी **तरुण आणि बेरोजगारी**या विषयावर आपली सुंदर अशी कविता सादर करून सर्व महाराष्ट्र राज्यातील कवींची आणि उद्घाटक ,अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे मने जिंकून घेतली.
आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्या भारत देशातील तरुण आणि त्यांना नसलेला रोजगार हा विषय फार उत्कृष्ट रित्या दिग्रस येथील प्रसिद्ध शीघ्रकवी कवी, संपादक, साहित्यिक, नाट्य लेखक उत्तमराव मनवर गुरुजी यांनी फार मोठ्या पोट तिडखीने मांडला.
नाशिक येथे राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधून एकमेव उत्तमराव मनवर गुरुजी यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
उत्तमराव मनवर कवी यांच्या प्रेरणेने नाशिक येथील उत्कृष्ट शिक्षिका उपासिका कवयित्री प्रज्ञा दिलीपराव रणवीर( मूळच्या यवतमाळकर) यांनी सुद्धा आपली कविता सादर करून सर्वांचे मने जिंकलीत.
उत्तमराव मनवर फारच उत्साही म्हणून दिग्रस परिसरात प्रसिद्ध आहेत .त्यांना आतापर्यंत महाराष्ट्ररत्न पुरस्कार दोनदा, धम्मभूषण पुरस्कार दोनदा, सीईओ यवतमाळ यांचा ** हरितदूत**पुरस्कार,आरंभी केंद्रभूषण पुरस्कार,दिग्रस पंचायत समितीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार,ईश्वर फाउंडेशन यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच जिल्हा परिषद यवतमाळ यांचा **आदर्श शिक्षक** पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार उत्तमराव मनवर गुरुजी यांना मिळालेले आहेत.
अशा या गुणी कवी उत्तमराव मनवर गुरुजी यांचं जिव्हाळा ग्रुपचे दानशूर दाते आयुष्यमान के .टी. जाधव सर माजी उपप्राचार्य तथा माजी सभापती न.प. दिग्रस,
ॲड. रविभाऊ तुपसुंदरे उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ, माजी पर्यवेक्षक एन. आर. मुनेश्वर,माजी पर्यवेक्षक विजय बन्सी पाटील आयुष्यमान डी.डी. मनवर सर,उत्कृष्ट गायक दासबाबू वानखेडे सर,उद्योजक राहुल इंगोले सर, समता पर्वाचे कोषाध्यक्ष धनंजय मस्के विषय शिक्षक ,उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रभाकर भगत, सर्वांचा आवडता तरुण तडफदार शिक्षक श्याम विणकरे,प्राध्यापक नरेंद्र मनवर,राजेश खडसे सर, बंडू खडसे सर ,जयपाल सोनोने अध्यक्ष प्रोट्रॉन संघटना दिग्रस, मूकनायक न्यूज चॅनल चे संपादक धर्मराज गायकवाड,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. वाल्मीकराव इंगोले साहेब माजी शिक्षणाधिकारी वर्धा, सचिव गौतम भोवते, कास्टाईब संघटनेचे दिग्रस तालुकाध्यक्ष एकनाथ मोगले सर व सरचिटणीस गजानन खरबडे सर ,पत्रकार पुरुषोत्तम कुडवे पत्रकार सुर्वे पाटील पत्रकार अरुण इंगोले, पत्रकार लक्ष्मण टेकाळे, प्रा. भरत बढे, विठ्ठलराव देशमुख, प्रा. गजानन खंदारे व दिग्रस येथील सर्व बौद्ध उपासक उपासिकाआणि दिग्रस मधील सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी कवी उत्तमराव मनवर गुरुजी टोपीवाले यांचे अभिनंदन केलेले आहे व पुढील आयुष्य कविता व साहित्य समर्पित करण्याकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत.