शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.२९
आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले खा. प्रफुल पटेल यांनी आरोग्य विभागाच्या व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मागील आठवड्यात पटेल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त यांच्याशी इमारतीच्या प्रगतीविषयी सविस्तर चर्चा केली होती.
कुडवा येथे ६९० कोटी रुपये निधीतून अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन इमारतीत ६५० खाटांची रुग्णसेवा व १५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण या महाविद्यालयात होणार आहे. खासदार प्रफुल पटेल हे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत व दर्जेदार बांधकाम होईल असा विश्वास यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.