शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.२९: आमगाव पोलिस ठाण्यातंर्गत सरस्वती इलेक्ट्रानिक दुकानात काम करीत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने करंट लागून मृत्यू झाला. ही घटना २६ जूनच्या सायंकाळी ५:०० वाजता सुमारासची आहे. रोहित बसंत निखारे (१६) रा. शिवनीता. आमगावअसे मृताचेनाव आहे.
सविस्तर असे की, फिर्यादी विनोद भागवत निखारे (४०) रा. शिवनी याच्या मोठ्या भावाचा मुलगा रोहित बसंत निखारे हा अल्पवयीन आहे. असे असतानाही आरोपीने त्याला कामावर ठेवले. घटनेच्या दिवशी आरोपी संतोष वासुदेव बिलोने (३८) रा. पावर हाऊस यांच्यासोबत तो काम करीत होता. आरोपीने त्याला ग्लेजींग क्लीप आणण्यास सांगितले. मृतक रोहित हा ग्लेजींग क्लीप आणत असताना जिवंत विद्युत तारेशी संपर्क झाल्याने त्याला करंट लागला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी वासुदेव बिलोने व कृष्णा चुटे (५२) रा. बनगाव यांच्याविरूध्द आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.