खेळत असलेल्या चिमुकलीला दुचाकीने चिरडले

Shabd Sandesh
0

शिरपूरटोला येथील घटना
शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.२९: तालुक्यातील
सिरपुरटोला येथे घरासमोर खेळत असलेल्या २ वर्षीय चिमुकलीला दुचाकीस्वाराने लापरवाहीने चालवून जबर धडक दिली. या घटनेत त्या चिमुकलीला मृत्यू झाला. ही घटना आज (ता. २७) सायंकाळ दरम्यानची आहे. तन्वी मयुर पटले (०२) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
   सविस्तर असे की, सिरपुरटोला येथे तन्वी मयुर पटले (०२) ही घरासमोर अंगणात खेळत होती. दरम्यान भरधाव दुचाकीच्या चालकाने लापरवाही व निष्काळजीपणे वाहन चालवून खेळत 29 असलेल्या तन्वीला जबर धडक दिली. या घटनेत जखमी तन्वीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तन्वीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपासकार्य सुरू केले असून या दुदैवी घटनेने गावात एकच शोककळा निर्माण झाली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)