मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून तातडीची मदत

Shabd Sandesh
0

खा.संजयभाऊ देशमुख यांच्या पाठपुराव्याल्या यश*

कँन्सरग्रस्त नझमुन्नीसा अब्दुल रब यांना  शस्त्रक्रियेसाठी मिळाले एक लाख रुपये.

 दिग्रस/प्रतिनिधी, दि.२२


नझमुन्नीसा अब्दुल रब रा.नवाबपुर, नेर तालुक्यातील रहवासी यांना कँन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. तत्काळ त्यांना जळगाव येथील प्रसिद्ध चांडक कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रेडिएशन सेंटर जळगाव येथे दाखल करण्यात आले. उपचार करणारे डॉ. निलेश चांडक यांनी 'मॉडिफाइड रॅडिकल नेक डिसेक्शन' या अत्यावश्यक शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे सांगितले. मात्र, या शस्त्रक्रियेवर सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे समजताच कुटुंबीयांवर काळजाचा डोंगर कोसळला, त्यांच्या आर्थिक परिस्थितीतुन एवढा खर्च पेलणे शक्य नव्हते.
या परिस्थितीत माजी नगरसेवक तन्वीर खान पठाण यांनी पुढाकार घेत खासदार संजयभाऊ देशमुख यांची भेट घेतली.

               नझमुन्नीसा यांच्यासाठी मदतीची विनंती केली. जनतेच्या अडचणीत सदैव धावून येणारे खासदार संजयभाऊ देशमुख यांनीही तत्काळ मदतीचा हात पुढे करत आपले स्वीय सहाय्यक गजानन कदम यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत अर्ज करण्याचे निर्देश दिले.गजानन कदम यांनी झपाट्याने आवश्यक कागदपत्रे गोळा करून अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक साहेब व अ‍ॅड. विशाल ठाकरे यांच्या सहकार्याने नझमुन्नीसा अब्दुल रब यांच्यासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ मंजूर करण्यात आली.
या मदतीमुळे नझमुन्नीसा यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून त्यांच्या कुटुंबीयांनी हृदयातून खासदार संजयभाऊ देशमुख, रामेश्वर नाईक साहेब, अ‍ॅड. विशाल ठाकरे, तन्वीर खान पठाण आणि गजानन कदम यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.ही मदत केवळ आर्थिक मदत नसून, एका कुटुंबासाठी जीवनाचे नवे आश्वासन ठरली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)