रायगड (ओडिशा): ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातील बगनागुडा गावात एका आंतरजातीय
शब्दसंदेश न्यूज,
विवाहानंतर (Odisha Intercaste Marriage) धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आदिवासी (एसटी) मुलीने अनुसूचित जातीच्या (एससी) तरुणाशी प्रेमविवाह (Love Marriage) केल्याने तिच्या संपूर्ण कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. ग्रामस्थांच्या दबावाखाली कुटुंबातील ४० सदस्यांनी जबरदस्तीने मुंडण करून घेतले व एका प्राण्याचा बळी देत तथाकथित शुद्धीकरण विधी पार पाडला.
.....
ग्रामपंचायतीचा अन्यायकारक निर्णय
प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मुलीच्या कुटुंबावर सामाजिक दडपण आणले स्थानिक पंचायतीच्या आदेशानुसार, कुटुंबाने समाजात पुन्हा सामावून घेण्यासाठी शुद्धीकरण करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. या विधीसाठी संपूर्ण खर्चही कुटुंबालाच उचलावा लागला स्थानिक देवतेसमोर प्राण्याचा बळी देण्यात आला व त्यानंतरच त्यांना समाजात पुन्हा स्वीकारले गेले
..........
व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासन सक्रिय
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात संबंधित कुटुंबातील सदस्य शेतात बसून मुंडण करताना दिसत आहेत या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून अनेक सामाजिक संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे.
........
यापूर्वीही झाली होती अशीच घटना
या वर्षाच्या सुरुवातीला ओडिशातील बारगड जिल्ह्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. एका तरुणाने इतर जातीच्या महिलेशी विवाह केल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला अंत्यसंस्कार करण्यासही परवानगी नाकारण्यात आली होती.
......
प्रशासनाची चौकशी सुरू
बातमी समोर येताच, काशीपूरचे ब्लॉक विकास अधिकारी विजय सोय यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. एक ब्लॉक स्तरीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. प्रशासनाने सांगितले की, चौकशी अहवालानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.