कत्तलीस जाणाऱ्या १९० गोवंशाची सुटका

Shabd Sandesh
0
 सालेकसा पोलिसांची धडक कारवाई : दोघांविरोधात गुन्हा दाखल

शब्दसंदेश न्यूज सालेकसा, दि.२६: कत्तलीकरिता नेण्याकरिता जंगलात बांधून ठेवलेल्या १९० जनावरांची सालेकसा पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. २३) करण्यात आली. याप्रकरणी ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महेश मनगटे (४०, रा. पानगाव) आणि पुनाराम रत्नाकर (४०, रा. गोवारीटोला) असे आरोपींचे नाव आहे. सालेकसा तालुक्यातील टेंभूटोला (पिपरीया) येथे कत्तलीकरिता नेण्यासाठी जनावरे एका ठिकाणी दाटीवाटीने बांधून ठेवल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे छापामार कारवाई केली. दरम्यान टेंभूटोला शिवारात एका ठिकाणी जनावरे अत्यंत दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची तसेच औषधोपचाराची कसल्याही प्रकारची सोय करण्यात आली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळावरून १९० जनावरांची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची किंमत ६ लाख ६५ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश मनगटे आणि पुनाराम रत्नाकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भूषण बुराडे, पोलिस नाईक दिनेश जांभूळकर, पोलिस हवालदार रितेश अग्निहोत्री, पोलिस शिपाई दिनेश गौतम, रविकांत लगदिवे, महिला पोलिस आरती अंबाडारे यांनी केली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)