रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीतील घटना
शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.२६: भरधाव वेगात येत असलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर बसलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री 10 वाजताच्या सुमारास सावरी पेट्रोलपंपासमोर घडली.
प्रकाश सुरजलाल बेदरे (30, रा. भानेगाव) असे मृत्यू झालेल्या तर अभिषेक भालचंद बेंदरे (56, रा. भानेगाव, मध्यप्रदेश) जखमी झालेल्याचे नाव आहे. हे दोघही एमपी 50/ झेडटी 3274 क्रमांकाच्या दुचाकीने बालाघाट ते गोंदिया मार्गाने गोंदिया कडे येत होते. दरम्यान या मार्गाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान सावरी पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात प्रकाश बेदरे याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर अभिषेक बेदरे हा गंभीर जखमी झाला. तक्रारीच्या आधारे रावणवाडी पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.