( ढीवर समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तथा समाज प्रबोधन सोहळा)
शब्दसंदेश न्यूज केशोरी, दि.२०
अखिल ढीवर समाज विकास समिती अर्जुनी/मोर द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम( दि.15) रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी प्राध्यापक तथा ढीवर समाज प्रबोधनकार जनार्दन नागपुरे होते.विशेष अतिथी सनथ वाढई कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य (धोबी समाज), अखिल धीवर समाज विकास समिति भंडारा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष मनोज केवट ,कार्याध्यक्ष गिरधारी भोयर , सचिव गोविंद मखरे ,तालुकाध्यक्ष राजूजी वलथरे , माधवन मानकर , अशोक शेंडे सरिता मेश्राम सदस्या, सौ.शालू कोल्हे ,कृपाल मानकर ,नितेश शहारे, वृंदा वलथरे प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते
मान्यवरांनी ढीवर समाजाचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावा यासाठी अखिल समाज विकास समिती मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलन आंदोलनाविषयी माहिती देऊन आरक्षण हे लोकशाहीमुळे प्राप्त होणार असे विचार अखिल ठेवा विकास समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज केवट यांनी यावेळी व्यक्त केले.
खरे तर राकेश कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थी व समाज बांधव यांच्यापुढे आपल्या जीवनाचे खडतर अनुभव कथन केले.( वयाच्या 24 व्या वर्षी 4 थी ते शासकीय नोकरी पर्यंतचा प्रवास कथन केले.
लिव्हर समाजातील अर्जुनी मोरगाव तालुक्या मधून इयत्ता 10 विद्यार्थी व इयत्ता 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्प गुच्छ,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये यामिनी रविंद्र मेश्राम,मयुरी रविंद्र मानकर, हर्षित फिरोज शेंडे, अतुल नारायण चांदेकर, उर्वशा देवदास मानकर , हर्षा राजेश मेश्राम, दुर्गेश नंदेश्वर कांबळे, गोपाल विलास भांगे, दिपाली वसंत मेश्राम, मोहिनी नामदेव सोनवणे, देवयानी श्रीकृष्ण गोपे तर इयत्ता बारावी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये होमेस तेजराम कोल्हे, तेजस्विनी मधुकर वलथरे, तेजस्विनी नेमीचंद वलथरे, खुशी काशीराम वलथरे , साक्रीत यशवंत शेंडे या गुणवंत विद्यार्थ्यांना समावेश होता.
काल फादर्स डे असल्याने सर्व गुणवंत विद्यार्थांनी आपल्या वडिलांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले.
कार्यक्रमाचे संचालन केशव कोल्हे तर आभार प्रदर्शन यशवंत शेंडे यांनी केले.
प्रथमच धीवर समाजामधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोह प्रसंगी तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक, माता, समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.