शाळेच्या इमारतीचे छप्पर कोसळून, झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

Shabd Sandesh
0
राजस्थान मधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावातील घटना
शब्दसंदेश न्यूज, दि.२५: राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पीपलोद गावामध्ये शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या झालेल्या या शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळत असल्याची जाणीव वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना झाली होती. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दरडावून वर्गातच बसवून ठेवल्याने काही वेळातच पुढील दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आता पाच शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती देताना एका विद्यार्थिनीने सांगितले की, शाळेच्या इमारतीच्या छप्परावरून दगड खाली पडत होते. जेव्हा मुलांनी याबाबतची माहिती शिक्षकांना दिली. तेव्हा शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना दरडावले आणि वर्गात बसवून ठेवले. त्यानंतर काही वेळातच छप्पर कोसळले आणि विद्यार्थी त्याखाली सापडले. ही दुर्घटना घडली तेव्हा शिक्षक जवळच नाश्ता करत होते.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत पाच शिक्षक आणि पाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्याशिवाय या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एक तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पाकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी आम्ही सरकारकडे विनवण्या करत होतो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता सरकार आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? असा हृदयद्रावक सवाल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे पालक विचारत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)