ट्रॅक्टरच्या धडकेत दहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

Shabd Sandesh
0

बाम्हणी-बोरी मार्गावरील घटना

शब्दसंदेश न्यूज तुमसर, दि.२९ : इयत्ता दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा ट्रॅक्टरला जोडलेल्या मिक्सर ट्रॉलीच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली. शिवानी (सिमरन) श्याम ठवकर (१५) रा. बाम्हणी असे मृतक विद्यार्थ्यांनीचे नाव आहे.
   घटनेच्या दिवशी सोमवारी शिवानी ही आपल्या मैत्रीनीसह सायकलने तुमसर येथील जनता विद्यालयात शाळेत जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर ट्राली ने धडक दिली असता शिवानीचा घटनास्थळी मृत्यू झाला. शिवानी ही तुमसर शहरातील जनता विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. वर्गात अतिशय हुशार होती.
  शिवानी ही मैत्रिणीसोबत सायकलने बाम्हणीवरून तुमसरकडे शाळेत येत असताना, सकाळी सुमारे ९. ३० वाजताच्या सुमारास बाम्हणी कोष्टी रस्त्यावर ट्रॅक्टर (क्र. एमएच ३६ एल ६१९) ला जोडलेली काँक्रीट मिक्सर ट्रॉली अचानक जवळ आली आणि तिच्या सायकलला धडक दिली. सदर धडकेत शिवानी रस्त्यावर फेकली गेली आणि गंभीर जखमी झाली. अपघात होताच ट्रॅक्टर चालक सुनील योगीलाल पटले (३८) रा. हसारा, ता. तुमसर याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने शिवानीला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. सदर अपघातामुळे ठवकर कुटुंबावर शोककळा पसरली असून शाळेतील शिक्षक, मित्रमैत्रिणी, गावकऱ्यांनी शिवानीच्या दुर्दैवी मृत्यूवर हळहळ व्यक्त केली आहे. काही नागरिकांच्या मते ट्रॅक्टरच्या मागील मिक्सर ट्रॉली योग्य पद्धतीने जोडली गेली नव्हती किंवा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. दरम्यान, आरोपी ट्रॅक्टर चालक सुनील पटलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक शिवानीच्या मृत्यू पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे. तिच्या अपघाती निधनाने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगवानी करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)