चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू

Shabd Sandesh
0

रावणवाडी पोलिस हद्दीतील ग्राम माकडी येथील घटना

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.१३: बकरी चारण्यासाठी शेजारी मोठ्या मुलांसह शेतात गेलेल्या चिमुकल्याचा मुरूमासाठी खोदलेल्या बांधीतील खड्यात पडून मृत्यू झाला. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम माकडी येथे शुक्रवारी (दि. ११) सकाळी घडली. नीत राजकुमार सोनवाने (४, रा. माकडी), असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. नीतच्या आईचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असून, वडील हैद्राबाद येथे मजुरीसाठी गेले आहेत. त्यामुळे नीत आपल्या आजीकडे राहत होता. घटनेच्या दिवशी नीत घराशेजारील मोठ्या मुलांसह बकऱ्या चारण्यासाठी लगतच्या शेतात गेला होता. मात्र, मुरूम खोदलेल्या बांधीतील खड्ड्यात पडला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी घेतली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)