खोट्या इंस्टाग्राम अकाउंटवर गावातीलच तरुणाने केला विवाहित महिलेचा अश्लील फोटो व्हायरल

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.१३: तिरोडा तालुक्यातील लाखेगाव येथील एका विवाहित महिलेचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने गावातील एका तरुणाविरुद्ध तिरोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तिरोडा तालुक्यातील ग्राम लाखेगाव येथील ३२ वर्षाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या गेल्या सहा महिन्यांपासून इन्स्टाग्राम वापरत होत्या. २४ मे २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता, मोबाइलवर इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना अक्षय श्रीनिवास नावाच्या अकाऊंटवर त्यांचा चेहरा असलेला आणि दुसऱ्या महिलेचे अर्धवट उघडे शरीर असलेला अश्लील फोटो आढळला. त्यानंतर त्यांनी तिरोडा पोलिस ठाण्यात अर्ज करून गोपनीय चौकशीची विनंती केली होती. पोलिसांनी खात्रीशीर तपास करून संबंधित अकाऊंट तपासले असता, हा फोटो अतुल रमेश डोहळे (२५, रा. लाखेगाव, ता. तिरोडा) याने तयार करून व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले. फोटो प्रसारित केल्यामुळे महिलेला मानसिक त्रास व बदनामी झाली. अखेर आरोपीची ओळख पटल्यावर त्यांनी पतीसह पोलिस स्टेशन गाठून याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत व बदनामीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)