विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास;मानवी हक्क आयोगाकडून दखल

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज मुंबई, दि.०३: अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी झाडाच्या फांदीवरून दोरीच्या साहाय्याने तोल सांभाळत प्रवास करावा लागत आहे. याप्रकरणी मानव हक्क आयोगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ही नोटीस बजावली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील नदीवर पूल नसल्याबाबत ‘लोकमत’ने ३० जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने त्याची दखल घेतली आणि स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती (नि.) अनंत बदर यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन नाशिकचे विभागीय आयुक्त, नंदुरबारचे जिल्हाधिकारी व नंदुरबारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. प्रकरणाचा वस्तुस्थितिदर्शक अहवाल आठ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)