भंडारा जिल्ह्यातील फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी
शब्दसंदेश न्यूज भंडारा, दि.१६:- जिल्ह्यातील साकोली येथील श्याम हॉस्पिटल चे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी 09 जुलै 2025 ला श्याम हॉस्पिटल मधे आरोग्य तपासणी करिता गेलेल्या बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफी तपासणी च्या नावावर अश्लील वर्तन व चाळे करून अन्याय (विनयभंग) करत बलात्कार ही केला. याबाबत पीडित मुलीच्या आई वडिलांनी साकोली पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तक्रारी वरून डॉ.देवेश अग्रवाल यांच्या विरुद्ध पोक्सो (POCSO) सह विनयभंग व एट्रोसिटी चा गुन्हा दाखल केलेला आहे. घटनेला 5 दिवस उलटून ही आरोपी डॉक्टर ला अटक झाली नसून आरोपी घटनेच्या दिवसापासून फरार आहे. या घटनेमुळे जनतेत प्रचंड रोष व असंतोष पसरलेला आहे. या घटनेच्या संदर्भात फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक/राजकीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार साकोली भेट घेतली.
24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात यावे, 24 तासाच्या आत दवाखाना सील करण्यात यावा, पीडित मुलीचा सोनोग्राफी करत असताना चा वैद्यकीय रूम मधला सीसीटीव्ही फुटेज तात्काळ तपासात घेण्यात यावा, रुग्णालयात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची साक्ष ही डॉक्टरच्या बचावासाठी असल्याने ग्राह्य मानल्या जाऊ नये, पीडित मुलीवर अन्याय करणाऱ्या आरोपी डॉक्टर चालवत असलेल्या श्याम हॉस्पिटल साकोली ची केंद्रीय तथा राज्य मेडिकल कौन्सिल ची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी, सदर घटनेचा तपास सी.आय.डी व सी.बी.आय सारख्या गुप्तचर यंत्रणेच्या निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा, सदर घटनेचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल व रुग्णालयातील साक्ष देणाऱ्या सहकर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल व त्याचा परिवार हा गर्भश्रीमंत असल्याने समाजातील काही लोकांच्या माध्यमातून पीडित मुलीला व तिच्या परिवाराला आर्थिक प्रलोभन व इतर आमिष देऊन सदर प्रकरणाला प्रभावित करून पीडित मुलीला व तिच्या परिवाराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पीडित मुलीला व तिच्या परिवाराला तात्काळ संरक्षण देण्यात यावे, दवाखान्यात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हजेरीचे रजिस्टर आणि घटनेच्या दिवशी रुग्णालयात सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हजेरीचे नोटबुक तात्काळ तपासात घेण्यात यावे, आरोपीच्या परिवारातील लोकांचे मोबाईल जप्त करून, तपासात घेऊन CDR घेण्यात यावा, सदर गुन्हा दाखल होत असतानाच गुन्ह्याची नोंद करणाऱ्या स्टेशन डायरी अंमलदार यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन द्वारे माहिती देऊन आरोपी डॉ.देवेश अग्रवाल याला गुन्ह्याची माहिती देऊन फरार होण्यास मदत केल्यामुळे स्टेशन डायरी अंमलदार सह त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन साकोली तहसीलदार यांना देण्यात आले.
सदर मागण्यांवर 24 तासात कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआक्रोश करण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते व विविध सामाजिक/राजकीय/धार्मिक संघटनांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तनुजा नागदेवे, यादोराव गणवीर, गीता वलथरे मनीषा खोब्रागडे, कोकिला रामटेके, गणेश गजभिये, बबीता राऊत रिपब्लिक सेना, अचल मेश्राम, मनोज खोब्रागडे, युगांधर बारसागडे बहुजन समाज पार्टी, बिट्टू गजभिये, कार्तिक मेश्राम, भावेश कोटांगले, छोटेलाल गेडाम, शीलवंत मेश्राम, प्रल्हाद रामटेके, हिरकल रामटेके, नितीन रामटेके, मोहन बोरकर, ओम प्रकाश कुंभरे खैरलांजी आदिवासी संघटना, मोहन बोरकर, विजय नागदिवे, मंगल तिरपुडे, नामदेव निपाणे, कैलास देशपांडे, अनिल मेश्राम, पूजा मडामे, नितीन रामटेके, भीमकला रामटेके भावेश कोटांगले,आदी बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.