महामंडळाच्या योजना फायदेशीरः जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष
शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.१९: सर्व सामाजिक महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता असावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्वच संवर्गातील अथवा सर्व स्तरांतील लाभार्थ्यांना सरकारच्च्या सर्व योजनांची माहिती आणि सेवा एकाच हा 'ऑनलाईन पोर्टल'वर मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महामंडळांसाठी एक सामाईक मार्गदर्शन केंद्र (सुविधा केंद्र) उभारण्यात येणार आहे.
सामाजिक महामंडळांमार्फत विविध योजनांचा लाभ त्या-त्या जाती-संवर्गातील लाभार्थ्यांना इ दिला जातो. विशेषतः आर्थिक अनुदान, साहित्य खरेदीवर अनुदान याशिवाय कर्ज योजनांचा लाभ मिळतो.
संकेतस्थळांमध्ये एकसंघता राहण्यास होणार मदत शासनाच्यावतीने नव्याने स्थापन होणारी सर्व महामंडळाची माहिती देखील या पोर्टल मध्ये समाविष्ट केली जाणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या महामंडळाच्या प्रशासकीय संरचनेत कोणताही बदल न करता त्यांना या पोर्टलचा लाभ घेता येणार आहे. सर्व महामंडळाच्या संकेतस्थळामध्ये एकसंघता राखता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्याची केंद्रामध्ये होणार सोय
समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी, कृषी या विभागासह इतर सामाजिक सर्व विभागांच्या वतीने विविध संवर्गातील नागरिकांना एकाच पोर्टलवर ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याची सोय देखील करण्यात आली आहे.
सुविधा केंद्राचे काम सुरू
एकाच छताखाली विविध योजनांची माहिती मिळणार आहे. महामंडळांकडून योजनांचा लाभघेण्यासाठी लाभार्थ्यांना महामंडळाचे कार्यालय शोधण्याची गरज भासणार नाही. त्यांना सुविधा केंद्रातच मार्गदर्शन मिळेल. सुविधा केंद्राचे काम सध्या सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात दिली.