आरोग्य विभागाकडून श्याम हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरची चौकशी सुरू

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज साकोली, दि.२०: ९ जुलैला एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत डॉ. देवेश अग्रवाल याने सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले होते. याची पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल होताच आरोपी डॉक्टर तेव्हापासून फरार आहे. याबाबत, शनिवार, १९ जुलैला आरोग्य विभाग भंडारा चमु संध्याकाळी ७:४५ ला श्याम हॉस्पिटलचे निरीक्षक करण्यासाठी आली होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आरोग्य विभाग चमुने येथे कागदोपत्री कारवाई केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एका अल्पवयीन १७ वर्षीय दलित मुलीसोबत ९ जुलैला डॉ. देवेश अग्रवाल याने अश्लील कृत्य केल्याचे साकोली शहरासह जिल्ह्यात संतापजनक पडसाद उमटले होते. आरोपी फरार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)