प्रशांत विद्यालय माटोरा येथील प्रकार; गुन्हा दाखल
शब्दसंदेश न्यूज भंडारा, दि.०५: प्रशांत विद्यालय, माटोरा येथील एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी, (दि. ४) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी कारधा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी मुख्याध्यापकाचे नाव प्रदीप सुरेश गेडाम (५५, रा. बेला) असे आहे. ते प्राथमिक विद्यालय माटोराचे मुख्याध्यापक असून, याठिकाणी शिकणाऱ्या कुलदीप नामदेव डोमळे (१४, रा. माटोरा) या विद्यार्थ्याने शाळेची विटांची भिंत लाथ मारून तोडली. या कारणावरून आरोपीने बांबूने कुलदीपच्या हातावर, पाठीवर, खांद्याजवळ आणि डाव्या पायावर मारहाण केली, यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. कारधा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.