आकाशातून पडला १६ किलो धातूचा तुकडा

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज जळगाव, दि.०५: जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवारी रात्री आकाशातून एका अनोखा १६ किलो वजनाच्या थातूचा तुकडा जमिनीवर पडल्यामुळे जळगावसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हातुकडा नेमका कुठून आला आणि कोणत्या धातूचा आहे. याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून जिल्हाभरात चर्चा रंगल्या आहेत. या विषयी इस्त्रो सस्थेला माहिती देण्यात आली आहे. पोलिसानी हा १६ किलो वजनाचा थातूचा तुकडा जप्त केला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्राताधिकारी विनय गोसावी याच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानी या रहस्यमय तुकड्याची पाहणी केली आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली. 'या रहस्यमय घटनेमुळे जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून जप्त उल्कापिंड की अन्य काही याविषयी जिल्ह्यात तर्कविर्तक लावले जात आहेत.
   
जळगाव जवळ एक मेटल ची वस्तू आढळली आणि ती अवकाशातून पडली असे म्हटले जाते. परंतु ती पडताना कुणी पाहिली असेल, पडल्या मुळे घराचे नुकसान झाले असेल किंवा जमिनीवर खड्डा पडला असेल तरच ती वस्तू अवकाशातून पडली म्हणता येईल अन्यथा अशा अफवा राहू शकतात. मी फोटो इस्रो च्या वैज्ञानिकांना पाठविले, त्यानी ती वस्तू पाहून सांगता येईल असेल म्हटले. अलीकडे अवकाशात खूप कचरा झाल्याने अशा वस्तू पडतात हे जरी खरे असले तरी ती वस्तू अवकाशातूनच पडली हे सिद्ध करावे लागेल. 
जळगावात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा उल्कापिड आहे की अन्य काही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. काही नागरिक याला खगोलशास्त्रीय घटना मानत आहेत, वैज्ञानिक तपासणीनतरच या रहस्यमय तुकड्यामागचे सत्य समोर येणार आहे. मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातही मोठा बर्फाचा तुकडा पडला होता, याचा या विषयाशी काही सबध आहे का? अशी ही चर्चा होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)