पैशाकरिता अल्पवयीन मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

Shabd Sandesh
0
   अंत्यसंस्कार झाल्यानंतर खड्ड्यात पुरलेला मृतदेह पोलिसांनी काढला होता बाहेर.... हत्येच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर फुटले घटनेचे बिंग

शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.०१: तालुक्यातील दासगाव येथील भारती सहारे (४४) यांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून आईचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्या १७ वर्षीय मुलावर रावणवाडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  भारती सहारे आपल्या १७ वर्षीय मुलासोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर गावातच नड्डे व अंडी विकून आपला उदरनिर्वाह करायची. भारतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता. असेच पैसे मागण्यावरून २६  जूनच्या रात्री दोन्ही मायलेकांत वाद झाला. या वादात मुलाने आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले, यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला. नंतर त्या अल्पवयीन मुलाने नातेवाईकांना आईच्या मृत्यू नैसर्गिक झाला असे सांगून अंत्यसंस्कार केले.. मात्र, पोलिसांना संशय आल्यानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले व यानंतर या घटनेचे बिंग फुटले.
 या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी १७ वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)