नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी. अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. या दरम्यान नाना पटोले आक्रमक झाले आणि ते विधानसभा अध्यक्षाजवळ गेले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)