पालकांनो पाल्यांना आवरा,अन्यथा कारवाईला सामोरे जा!

Shabd Sandesh
0

| वाहतूक शाखेचा सज्जड ईशारा

शब्दसंदेश न्यूज भंडारा, दि.२१: सध्या अल्पवयीन दुचाकी वाहन चालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. पालक सुद्धा आपल्या पाल्याकडे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेले आहे. यावर आळा बसावा याकरिता वाहतूक शाखेने गंभीर पावले उचललेले असून तसे पत्र आता शाळा महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे. पालकांवर कारवाई करण्यासह आता सरसकट शाळा, महाविद्यालयाला पत्र देऊन अल्पवयीन दुचाकी वाहन मालकावर वाहतूक शाखा सध्यातरी लय भारी पडल्याचे दिसून येत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना आवरा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा असा सज्जड इशारा वाहतूक शाखेने दिलेला आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेने शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसला जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी वाहन चालकांना आणि त्यांच्या पालकांना गंभीर इशारा दिलेला आहे. या संदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेने एक सूचनापत्र जारी केलेले आहे. ज्यात पालकांना मोटर वाहन सुधारित अधिनियम २०१९ नुसार कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे स्पष्ट केलेले आहे. अनेक अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी चालवून शाळा, कॉलेज किंवा कोचिंग क्लासेस मध्ये येत असतात. हे बेकायदेशीर असून यामुळे विद्यालयांच्या सुरक्षिततेला आणि इतरही वाहन चालकांना धोका निर्माण होतो. यामुळे दिवसेंदिवस अपघातामध्ये वाढ होत असल्याचे पोलीस विभागाच्या निदर्शनात आले आहे. या सूचनापत्रानुसार सर्व शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसना त्यांच्या वर्ग शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना या कायद्याची जाणीव करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच पालकांच्या व्हाटसअप ग्रुपवरही सूचना प्रसारित करण्यास सांगण्यात आले आहे. विशेष हे सूचना पत्र मिळाल्यापासून २४ तासाचे आत ही माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचविणे बंधनकारण करण्यात आले आहे. या मुदतीनंतर जर अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी चालविताना आढळले आणि त्यांच्यावर कारवाई झाली तर पालकांकडून येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही असेही वाहतूक नियंत्रण शाखेने स्पष्ट केलेले आहे.

पालक देतात अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहनांची धुरा
कायद्याची कठोरता वाहतूक शाखा विभागाच्या वतीने पालक आणि शैक्षणिक संस्थांना या गंभीर बाबीकडे सध्यातरी लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सुरक्षितता धोक्यात येणार नाही. वाहतुक नियमांचे पालन करून सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. मोटार वाहन सुधारित अधिनियम २०१९ च्या कलम १९९ नुसार जर एखाद्या अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिले तर पालकांना किंवा वाहन मालकाला तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा २५ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. हा दंड पूर्वीच्या कामकाजापेक्षा खूप जास्त असून यातून कामाची कठोरता स्पष्ट होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)