धुकेश्वरी मंदिर तर्फे पोळा आणि तान्हा पोळ्याचे आयोजन

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश देवरी, दि.१९: दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समितीच्या वतीने भारतीय संस्कृतीला मान देऊन २२ ऑगस्ट शुक्रवारला बैलांचा पोळा आणि २३ ऑगस्ट शनिवारला बालगोपाळासाठी तान्हा पोळ्याचे  आयोजन केले आहे.
       यात २२ ऑगस्ट शनिवारला धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात सर्व बैल जोड्या आल्यानंतर दुपारी ०२ वाजता धुकेश्वरी मंदिरातून सर्व बैलजोड्या वाजत गाजत नगर पंचायतच्या पटांगणावर नेण्यात येतील.  त्यानंतर सर्व बैलजोड्यांची पूजापाठ केल्यानंतर आकर्षक तथा उत्तम सजावट असलेल्या बैलजोडीस प्रथम पुरस्कार माजी आमदार सहषराम कोरोटे यांच्याकडून ५००१ रुपये,  द्वितीय पुरस्कार आमदार संजय पुराम यांच्याकडून ३००१ रुपये आणि तृतीय पुरस्कार धनश्री सिमेंट प्रोडक्ट कडून २००१ रुपये देण्यात येतील.  तर,  सुखदेव काळबांधे यांच्याकडून सात जोडी मालकांना प्रत्येकी दोनशे रुपये आणि धुकेश्वरी मंदिर समिती कडून उपस्थित प्रत्येक बैल जोडी मालकास गमछा व टोपी देण्यात येईल.
       २३ ऑगस्ट शनिवारला धुकेश्वरी मंदिराच्या पटांगणावर दुपारी ०३ : ०० वाजता बालगोपाळासाठी तान्हा पोळ्याचे आयोजन केले आहे.  यात उत्तम नंदी बैल प्रथम पुरस्कार स्वर्गीय पतीराम शेंद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा. मधूकर शेंद्रे यांच्याकडून १००१ रुपये, द्वितीय शिवकुमार परिहार यांच्याकडून ७०१ रुपये  आणि  तृतीय पुरस्कार शेखर गुप्ता यांच्याकडून ५०१ रुपये.   तर, उत्तम वेशभूषा बालकांना शर्मा दुध डेअरी कडून प्रथम पुरस्कार ७०१ रुपये, द्वितीय कुवरलाल भेलावे यांच्याकडून ५०१ रुपये आणि तृतीय पुरस्कार बाबुराव क्षीरसागर गुरुजी यांच्याकडून ३०१ रुपये.  नंदी बैलासह भाग घेणाऱ्या सर्व बाल गोपाळाना भय्यालाल चांदेवार आणि छोटेलाल बिसेन यांच्याकडून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येईल.
       तरी या दोन्ही पोळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट समिती आणि उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)