ई-रिक्षा चार्जिंग करतांना घडली घटना
शब्दसंदेश न्यूज तिरोडा, दि.२४: हल्ली अनेक उपकरणांना चार्जिग करावी लागते. परिणामी विद्युत धक्क्याचेही प्रकार वाढले आहेत. अशातच तिरोडा येथील संत रविदास वार्ड येथील रहिवासी आपल्या ई-रिक्षाला चार्जिंग करीत असतांना विद्युत धक्का लागल्याने बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २२ सप्टेंबर सायंकाळच्या सुमारासची आहे. नरेश हरीदास बरईकर (५०) व दुर्गेश नरेश बरईकर (२१) रा. संत रविदास वार्ड तिरोडा असे मृत बापलेकाचे नाव आहेत.
सविस्तर असे की, २२ सप्टेंबर रोजी दिवसभर रिक्षाने प्रवास्यांना सोडल्यानंतर नरेश बरईकर घरी आले. दरम्यान हा ई-रिक्षा अल्याने बॅटरी दररोज चार्जिंग करावी लागते. त्याच अनुषंगाने सायंकाळच्या सुमारास ई रिक्षा चार्जिंगला लावत असताना अचानक टिनच्या शेडमधून विद्युत प्रवाह आला आणि
नरेश बरईकर यांना जोरदार विद्युत शॉक लागला. विद्युत धक्का लागताच, मुलगा दुर्गेश याने वडिलांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र तोही विद्युत शॉकच्या संपर्कात आला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच लाकडी काठीने त्यांना विद्युत तारेपासून विभक्त केले, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यूझाला होता. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. व तातडीने उपजिल्हा
तिरोडा येथील संत रविदास वार्डात विद्युत धक्क्याने बापलेकाचा मृत्यू झाला. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार ई-रिक्षा चार्जिंग करतांना घटना असल्याचे बोलले जात आहे. तर पोलिस प्रशासनाकडून विद्युत धक्का लागल्याने मृत्यू झाला हे स्पष्ट असून मोबाईल चार्जिंग करत्यावेळी हा प्रकार झाल्याची माहिती आहे. दरम्यान फिर्यादी भुपेंद्र बरईकर यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोनि. अमित वानखेडे करीत आहेत.
रुग्णालयात नेण्यात आले मात्र पुर्वीच मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना मृत घोषित केले. या घटनेने तिरोडा शहरात शोककळा पसरली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तसेच मृताच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.