शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पमुदतीच्या प्रशिक्षणाला शुभारंभ

Shabd Sandesh
0
   अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमामुळे युवकांना रोजगाराच्या संधी:–आ. संजय पुराम
   
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.०९

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देशभर अल्पमुदतीच्या प्रशिक्षण (Short Term Courses) कार्यक्रमाचा आभाषी पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून देवरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     या प्रसंगी आमदार आमगाव -देवरी मतदारसंघाचे आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष संजू उईके, जगदीश खडसिंगे (विश्वकर्मा लाभार्थी), प्रविण दहिकर (आ.यु.स.स. सदस्य), शंकरलाल अग्रवाल तसेच संस्थेचे प्राचार्य व्ही के कावळे व शिक्षकवर्ग उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी या प्रशिक्षणांचा कसा उपयोग होईल यावर भर दिला.
आमदार संजय पुराम यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी वाढतील तसेच स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होईल.” त्यांनी देवरी तालुक्यातील युवकांना या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास सुमारे ५०० नागरिक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य व्ही.के. कावळे यांनी केले. आभार प्रदर्शन बी. एन. तुमडाम यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)