युवतीची निर्घुण हत्या; दवनीवाडा पोलिस हद्दीतील घटना

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज तिरोडा, दि.१०: तिरोडा तालुक्यातील बोंडरानी/अर्जुनी येथे आज ९ ऑगस्ट रोजी शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या एका युवतीची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कु. आचल प्रकाश कोबळे (२०) रा. बोंडरानी असे घटनेत मृत्यू पावलेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे दवनीवाडा पोलिसांपुढे आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन उभे झाले आहे. या घटनेला घेवून परिसरात उलट-सुलट चर्चेलाही पेव फुटले आहे. 7

सविस्तर असे की, बोंडरानी येथील आचल प्रकाश कोबळे ही युवती काल ८ ऑक्टोबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत जेवन करून झोपली. पहाटे ५ वाजेच्या सुमारास ती शौचालयासाठी घराबाहेर पडली. दरम्यान घरालगतच्या बांबूच्या रानात आचल ही रक्ताच्या थारोळ्यात सकाळी ६ वाजेच्या सुमारास नागरिकांना दिसून आली. यामुळे एकच परिसरात खळबळ उडाली. आचलच्या कुटुंबियासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान तिला तुर्त उपचारासाठी तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घनटेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर, पोनि. वैशाली ढाले यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाला भेट दिली. तसेच पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणात हत्येचा गुन्हा

धारदार शस्त्राने चिरला आचलचा गळा

बोंडरानी येथील आचल ही शौचालयासाठी घरून निघाली मात्र ती परत आली नाही. सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावात दैनिक संचार सुरू झाला. त्यातच आचलच्या घरापासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात आचल दिसून आली. दरम्यान आचलच्या गळ्यात धारदार शस्त्राच्या जखमा दिसून आला. त्यातून रक्ताचा स्त्राव सुरू होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी आचलचा गळा चिरून हत्या केल्याची बाब प्राथमिक स्थरावर दिसून येत आहे.

उलट-सुटल चर्चेला उधान

आचल ही काही दिवसापुर्वी बेपत्ता असल्याची चर्चा होती. त्यातच आचल पुन्हा गावी परतली. कुटुंबासह राहू लागली. मात्र आचलला कुणीतरी अज्ञात युवक संपर्क करून धमकी देत असल्याचे बोलले जात होते. त्यातच आचलच्या भावाने या संदर्भात पोलिसांकडेही तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकतर्फी प्रेम प्रकरणातून तिची हत्या झाली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणाचा पोलिस तपासाकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडा पोलिस करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)