दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क गोंदिया : गोरेगाव पोलिस ठाण्यातंर्गत नोनीटोला गाव शिवारात दुचाकी घसरून पडल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. ही घटना २१ नोव्हेंबरची आहे. पवन भोजराज मानकर (२७) रा. देवुटोला असे मृतकाचे नाव आहे. तर दिनेश मेश्राम हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

सविस्तर असे की, देवूटोला येथील पवन भोजराज मानकर व दिनेश मेश्राम हे दोघे जण दुचाकी क्र. एमएच-३५/एएस-०५४९ ने जात होते. दरम्यान वाहन निष्काळजीपणे चालविल्याने दुचाकी घसरून पडली. या घटनेत दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यातील पवन मानकर याचा मृत्यू झाला. तर दिनेश मेश्राम जखमी आहे. फिर्यादी भोजराज मानकर (६५) याच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रशांत भुते करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)