कुटुंबीयांकडून प्रियकराची हत्या; प्रेयसी ने केले मृतदेहासोबत लग्न

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज नांदेड : बहिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी सायंकाळी एका तरुणाचा गोळी झाडून व डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला. दरम्यान, आमच्या प्रेमास विरोध करून वडील व भावांनी त्याला संपविले. असे असले तरी मी लग्न करून कायम त्याचीच राहील, असे म्हणत प्रेयसीने चक्क मृतदेहासोबत लग्न केले. प्रियकराला मारून कुटुंब हरले व त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी जिंकल्याची भावना मुलीने व्यक्त केली.
गुरुवारी सायंकाळी सक्षम ताटे हा मित्रांसोबत थांबलेला असताना हिमेश मामीडवार याच्यासोबत त्याचा वाद झाला. यावेळी हिमेश व त्याच्यासोबत असलेल्या एकाने सक्षमवर गोळी झाडली. त्याचा जागीच मृत्यू झाला.

अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रेयसी झाली हजर

शुक्रवारी सायंकाळी सक्षमच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याची प्रेयसी आंचल सक्षमच्या घरी पोहोचली. सक्षम हयात नसला तरी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी कायम त्याच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचे तिने सांगितले. तसेच याप्रकरणी वडील व दोन्ही भावांविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी मागणी तिने यावेळी केली. मृत सक्षम ताटे व मुख्य आरोपी हिमेश मामीडवार हे पूर्वाश्रमीचे मित्र असून, दोघेही हिस्ट्रीशिटर गुन्हेगार होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)