कुमारी मातेने गाठला कृरतेचा कळस: नवजात बाळाला फेकले विहिरीत

Shabd Sandesh
0

शब्दसंदेश न्यूज एकोडी (तिरोडा)

गोंदिया तालुक्यातील एकोडी येथे आपले पाप लपवून अब्रु वाचविण्यासाठी नवजात बाळाला घरगुती विहिरीत फेकून हत्या केल्याचा प्रकार आज (ता. २९) उघडकीस आला. या घटनेचे एकोडीसह परिसरात गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी तपास हाती घेतल्यानंतर एका कुमारी मातेने कुरतेचा कळस गाठून हा प्रकार केल्याचे समोर आले. गंगाझरी पोलिसांनी या प्रकरणी कुमारी मातेला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, एकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील भागात ढिवरटोली येथील रहिवासी राजेंद्र श्रीराम ठाकरे हे घरातील विहिरीत पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना एक नवजात बाळाचे शव आढळले. या घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना देण्यात आली. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी घटनास्थळ गाठून एकच गर्दी केली. तसेच घटनेला घेवून गावात चर्चाना उधाण आले. दरम्यान राजेंद्र ठाकरे यांनी तंमुस अध्यक्ष संतोष रिनायत यांच्यासोबत गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करण्यास सुरूवात केली. शेजारी सार्वजनिक विहिर असताना घरगुती विहिरीत नवजात बाळाला कोणी फेकले असावे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यातच गंगाझरी ठाण्याचे सहा. पोनि सुधीर वर्मा यांनी आपल्या सहकारी चमुसह तपासकार्य सुरू केले असता प्रेमप्रसंगातून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म देताच विहिरीत फेकल्याचे समोर आले आहे. यामुळे त्या कुमारी मातेने पाप लपवून अनु वाचविण्यासाठी क्रूरतेचा कळस गाठल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. या प्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात कलम १०३ (१), १२, २३८ भान्यासं अतंर्गत गुन्हा नोंद केला असून त्या अल्पवयीनमुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास गंगाझरी पोलिस करीत आहेत.
       
     प्रेम प्रसंगातून गर्भधारण

अल्पमुलीचे एका मुलाशी प्रेम संबंध जुळले. यातूनच त्या मुलीला गर्भधारणा झाली. समाजात आपली बदनामी होऊ नये म्हणून नवजात बाळाचा जन्म होताच हत्या करून विहिरीत फेकल्याचे चौकशीत समोर आले आहे.


       अन् घटनेचे बिंग फुटले

काही दिवसांपूर्वी रावणवाडी पोलिस ठाण्यातंर्गत डांगोर्ली येथे नवजात बाळाला नदीपात्रात फेकून हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेची शाई सुकली नाही की, आज एकोडी परिसरातील ढिवरटोली येथे कुमारी मातेने जन्म देताच बाळाला विहिरीत फेकल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले. दरम्यान तपासाची सुई समोर सरकत असतानाच त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार व माजी सरपंच किरणकुमार मेश्राम हे लघुशंकेकरीता घरातील मागील भागात लघुशंकेकरीता गेले असता त्यांना संशयास्पद स्थिती व रक्ताचे डाग दिसून आले. याची माहिती लगेच उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी परिसर सिल करून फॉरेन्सिक चमुला पाचारण केले. घटनेला घेवून ठाकरे कुटूंबियांची कसून चौकशी केली असता बाळाला जन्म देत गळा दाबून हत्या केले. तसेच विहिरीत फेकल्याची कबूली अल्पवयीन मुलीने दिली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)