शब्दसंदेश वार्ता गोंदिया, दि.१३: तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत कामठा येथील एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ३२ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना ११ जानेवारीच्या सायंकाळी ७ ते ८ वाजता सुमारासची आहे. या प्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाआहे. गौतमहरीराम बहेकार (३२) रा. कामठा असे आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील कामठा येथे साडेतीन वर्षीय चिमुकली अंगणात खेळत होती. दरम्यान आरोपीने तिला फुसलावून निर्जनस्थळी नेवून तिच्याशी अश्लिल चाळे केले. ही बाब त्या चिमुकलीने आई-वडिलांना सांगितले. यामुळे पीडित मुलीच्या पालकांकडून रावणवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी गौतम बहेकार विरुद्ध कलम ६४ (२) (आय), ६५ (२) बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८, १२ भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच आरोपी विरुद्ध अॅट्रासिटीचाही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर करीत आहेत.
