देवरी नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीची बिनविरोध निवड

Shabd Sandesh
0
रितेश अग्रवाल, नुतन सयाम, पिंकी कटकवार यांची वर्णि.
शब्दसंदेश न्यूज देवरी,ता.२५ : देवरी नगरपंचायती मध्ये रिक्त असलेल्या विविध विषय समिती सभापती पदांसाठी मंगळवार (ता.२४ फेब्रुवारी) रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवड बिनविरोध करण्यात आली. 
          यात बांधकाम व पाणीपुरवठा सभापतीपदी रितेश सुरेश अग्रवाल यांची आणि अर्थ नियोजन व क्रीडा सभापतीपदी नूतन अमरलाल सयाम , तर महिला व बालकल्याण सभापतीपदी पिंकी पारस कटकवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
          ही निवडणूक सभा उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी
केल्यानंतर, प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली. 
         यावेळी नवनियुक्त सभापतींनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या प्रलंबित विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. प्रामुख्याने बांधकाम आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावणे, क्रीडा क्षेत्रासाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे आणि महिला-बालकांच्या
कल्याणासाठी विविध योजना राबवण्याचा मानस  व्यक्त केला. 
          या सभेत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, गटनेते शेंकी भाटिया, आफताब शेख, संजय दरवडे, तनुजा भेलावे, प्रभू डोंगरे, कौसल्या कुंभरे, कमल मेश्राम, पंकज शहारे, मोहन डोंगरे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी करिष्मा वैद्य प्रामुख्याने उपस्थित होत्या.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)