शासनाने प्रतिबंधित केलेली ७० किलो पॉलीथीन जप्त; गोंदिया शहर पोलीसांची कामगीरी

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.१३

       दि. ९ जून २०२५ रोजी एक इसम जैन कशाल  भवनजवळ हात ठेल्यावर आठ ते दहा पांढ्यया पोत्यात प्लॉस्टीक पन्नीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेली पॉलीथीन घेवून जात आहे अशी  गोपनिय माहिती गोंदिया शहर पोलीसांना मिळाली होती. त्याप्रमाणे गोंदिया शहर  डी.बी. पथकातील अंमलदार यांनी पो.नि. किशोर  पर्वते यांच्या मार्गदर्शनात  त्याठीकाणी जावून पाहणी केली असता एक इसम हा हातठेल्यावर ९ पांढ्यया पोत्यात शासनाने  प्रतिबंधीत केलेली ७० किलो किं.अं. ३६०००/- रु. ची प्लॉस्टीक पन्नी घेवून जातांना मिळुन आला. सदरची पॉलीथीन ही शासनाने प्रतिबंधीत केलेली असल्याने पुढील कार्यवाही कामी जप्त करण्यात आली. सदर मालाबाबत चौकशी  केली असता शैलू  राजेंद्र असाटी रा. सब्जी मंडी इसरका मार्केट गोंदिया यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मिळुन आलेली पॉलीथीन ही शासनाने प्रतिबंधीत केलेली असल्याने पुढील कार्यवाही कामी नगर परिषद गोंदिया येथे माहिती दिली असता तेथील स्वच्छता विभाग प्रमुख नितीन बोरखडे यांनी येवून शैलू  राजेंद्र असाटी याच्याकडुन दि. १० जून २०२५ रोजी ५०००/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे. तरी, शासनाने प्रतिबंधीत केलेली पॉलीथीन कोणी विक्री करतांनी आढळुन आल्यास यापुढे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल . 
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया नित्यानंद झा,  अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस स्टेशन  गोंदिया शहरचे  पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सतीश शेंडे , सुदेश  टेंभरे, निशिकांत  लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, पौषी. सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते,अशोक  राहांगडाले, प्रमोद शेंडे , सोनु नागपुरे, राकेश बंजारे यांनी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)