हिवताप रक्त तपासणीत १३ नमुने दूषित पत्ता सीजन व बाहेरगावून आलेल्यांची रक्त तपासणी

Shabd Sandesh
0

आरोग्य पथकाची स्थलांतरीत मजुरांवर नजर
शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.१४: जिल्ह्याच्या सिमेला लागून मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्य आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्याची सिमाही लागून आहे. दरवर्षी जिल्ह्यातील मजूर हे तेंदूपत्ता, पत्ता सीजन, बास कटाई, बांधकाम, रस्ता कामे व इतर विविध कामानिमित्त स्थलांतर करीत असतात. अशात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. शिवाय स्थलांतरीत मजूर हे सीमा भागात जंगलव्याप्त परिसरात वास्तव्यास असल्याने किटकजन्य आजाराचा हिवताप संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने पुढाकार घेत स्थलांतरीत मजुरांचा शोध घेवून त्यांची हिवताप रक्त तपासणी करण्यात आली. अशा ४४९८ मजुरांची रक्त तपासणी करून प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. यातील  १३ नमुने हिवताप दुषित आढळल्याची माहिती आहे.
सिमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर होत असते. तेंदूपत्ता, पत्ती सीजन, बास कटाईसह अनेक कामांसाठी मजुर छत्तीसगढ, मध्यप्रदेश राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात जात असतात. जंगलव्याप्त परिसरात मजुरांचे महिनोमहिने वास्तव असतो. यामुळे किटकजन्य व हिवताप संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. कामदरम्यान मजुरांकडून आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. तर दुसरीकडे सीजन संपल्यानंतर हे मजुर स्वगावी परत येतात. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप व संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेवून स्वगावी परतेल्या मजुरांचा शोध घेवून त्यांची रक्त व आरोग्य तपासणी केली जात आहे. यासाठी आरोग्य पथक कार्यरत करण्यात आले आहे. जिल्ह्यातून यावर्षी जवळपास १२२८९ स्थलांतरीत मजुर जिल्ह्याबाहेर कामानिमित्त गेले होते. त्यापैकी ४४९८ मजुर स्वगावी परतले आहेत. या ४४९८ मजुरांची आरोग्य विभागामार्फत रक्त तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या अहवालात १३ लोकांचे नमुने हिवताप दुषित आढळल्याचे समोर आले आहे. यावर उपचार सुरू करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ९९०० स्थलांतरीत मजुरांची रक्त तपासणी करण्यात आली होती. यातील ९३ लोक हिवताप दुषित आढळले होते.
.....................
तालुकानिहाय स्थलांतरीत मजूर
जिल्ह्यात मागील वर्षी ९९०० स्थलांतरीत मजुरांची रक्त तपासणी दरम्यान ९३ लोक हिवताप दुषित आढळले होते. जिल्ह्यात प्रामुख्याने हिवतापाचा शिरकाव स्थलांतरीत मजुरांपासुन होत असतो. ह्यावर्षी १२२८९ स्थलांतरीत मंजुर हे बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. यामध्ये गोंदिया तालुक्यातून १०१८, तिरोडा तालुक्यातून ६८०, आमगाव तालुक्यातून २७९१, गोरेगाव तालुक्यातुन १२३३, देवरी तालुक्यातून १५६५, सडक अर्जुनी तालुक्यातून  १२८२, सालेकसा तालुक्यातून २३४५ व अर्जुनी मोरगाव  तालुक्यातून  १३७५ लोक बाहेरगावी गेले असल्याची माहीती हिवताप विभागाचे आशिश बल्ले यांनी दिली आहे.  सद्यस्थितीत ४४९८ लोक स्वगावी आपल्या जिल्ह्यात परतले आहे.
........................
आरोग्य विभाग सक्रिय
आरोग्य विभागामार्फत आशा सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचे मार्फत स्थलांतरीत मंजुराचा शोध घेवुन गावात आल्याबरोबर त्यां लोकांची हिवताप चाचणी संबंधाने आरडीके.(जलद ताप सर्वेक्षण कीट) द्वारे रक्त तपासणी करीत आहे. आरोग्य कर्मचारी दिवस रात्र एक करुन गावोगावी गृहभेटीतुन स्थलांतरीत मजुरांचे रक्त तपासणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. तरी परतीच्या वेळी आल्यानंतर कुठलेही ताप सदृश्य किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास रक्ताची तपासणी करून घेण्याबाबतचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)