अवैध रेती चोरी प्रकरण; १ कोटी १० लाख ६९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

Shabd Sandesh
0
गोंदिया पोलीस यांची अवैध रेती चोरट्यांविरुद्ध धडक कारवाई
शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.१६

 स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस पथकाने मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक - १७/०६/२०२५  रोजी चे पहाटे 0५/00 वा. सुमारास पो. ठाणे दवनिवाडा  हद्दीत कारवाई करत पोलीस पथकाने ग्राम साईटोला गावा जवळील वैनगंगा नदीच्या पात्रामधुन अवैध रेती (वाळु) उत्खनन करणा-या तस्करांवर छापा घालून ०५ टिपर ताब्यात घेण्यात आले. चालक व टिप्पर मालंकावर कारवाई करण्यात आली आहे. ५ टिपर व २३ ब्रास रेती असा एकुण किमती १,१०,६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पो स्टे दवनिवाडा येथे नोंद करण्यात आला आहे.
            सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया,  गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम अहेरकर  यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक सपोनि धीरज राजूरकर, अंमलदार संजय चव्हाण, भुवनलाल देशमुख, सोमेन्द्रसिंग तुरकर , छगन विठ्ठले  चापोशी  राम खंदारे  यांनी कारवाई केलेली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)