उधारीचे पन्नास रुपये उठले जीवावर; चौघांवर शस्त्र हल्ला; एक ठार

Shabd Sandesh
0
पन्नास रुपयांवरुन म्हाडा कॉलनीत खून


शब्दसंदेश न्यूज लातूर, दि.१८

पान टपरीच्या उधारीचे ५० रुपये मागितले म्हणून हुज्जत घातली. याचा जाब विचारण्यास गेलेल्या चौघांवर झालेल्या हल्ल्यात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. इतर दोघे किरकोळ जखमी झाले. सोमवारी रात्री सळा दहाच्या सुमारास लातूर शहरातील म्हाडा कॉलनी हा थरारक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील बाभळगाव रोडवरील म्हाडा कॉलनीत बालाजी देविदास गायकवाड यांची पान टपरी आहे. या पान टपरीवर शेख नावाचा तरुण सोमवारी दुपारी गेल्यानंतर पानटपरी चालक बालाजी गायकवाड ने त्याच्याकडे पन्नास रुपये राहिलेले उधारी मागितली. यावेळी तू मला उधारी मागतोस का? असा सवाल करीत शेख याने त्याच्याशी उज्जत घातली, तसेच शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर अरबाज शेख तिथून निघून गेला.
दरम्यान या प्रकारानंतर पान टपरी चालक बालाजी देविदास गायकवाड रात्री दहाच्या सुमारास गणेश उत्तम सूर्यवंशी, राजू दास काळुंके व करण राजू काळुंके यांच्यासोबत आब्बास शेख व शहजाद शेख यांच्या महाडा कॉलनीतील घराकडे गेले. दुपारी झालेल्या प्रकाराबाबत वादावादी सुरू झाली असता अरबाज शेख व शहजाद शेख या दोघांसह अन्य अनोळखी दहा बारा जणांनी मिळून बालाजी गायकवाड व त्याच्या साथीदारांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात गणेश उत्तम सूर्यवंशी याच्या छातीत सुरा खूपसल्याने तो जागीच ठार झाला. तर बालाजी गायकवाड यांच्या पोटाला तुला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात राजू काळुंके आणि करण काळुंके हे किरकोळ जखमी झाले.दरम्यान घटनेनंतर जखमींना तात्काळ लातूरच्या विलासराव देशमुख सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यातील जखमी राजू काळुंके यांच्या फिर्यादीवरून आब्बास शेख आणि शहजाद शेख यांच्या विरोधात मंगळवारी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीना मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कांबळे हे करत आहेत.
...........
दोघाही आरोपींना  २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी
पानटपरीची ५० रुपयांची उधारी मागितल्याच्या कारणावरून हा वाद झाला. या वादातूनच बाचाबाची झाली आणि आरोपींनी धारदार शस्त्र, सुरा, कोयत्याने चौघांवर हल्ला केला. यातील गंभीर जखमी गणेश सूर्यवंशी याचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)