अर्धे मृग नक्षत्र लोटले, कोल्ह्याची कुई § § कुई पाऊस पडेना!

Shabd Sandesh
0
शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा, २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्रास होणार प्रारंभ
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क देवरी, दि.१६ जून २०२५

रात्रंदिवस कबाड कष्ट करून शेतात राबणाऱ्या बळीराजाला सध्या पावसाची आस लागली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. वर्षभरातील मेहनती नंतरही कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. पाचवीला पूजलेली संकटे झेलत व मोठ्या हिमतीने शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. मात्र, मृगाचे अर्धे नक्षत्र लोटले असताना, कोल्ह्याची कुई $ $ कुई पाऊस पाडू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्हा हा आदिवासी भाग आहे. येथे सिंचनाची वाणवा आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी पूर्णतः पावसावर अवलंबून आहेत. मागील अनेक वर्षापासून निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. यावर्षी उन्हाळ्यातही अवकाळी पावसाने थैमान घातले. आता मान्सूनची चाहूल लागली. बळीराजा पूर्व पावसाळी कामामध्ये व्यस्त आहे. यंदा बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत तरी उसनवारी करून खरिपाची लागवड करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. शेतात साफसफाई करून शेतकरी मृग नक्षत्राच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. २५ मे पासून नवतपाने नागरिक हैराण होते. नवतपा संपला अधून मधून आकाशात ढगे जमा होत आहेत. सूर्य मात्र अजूनही तापत आहे. पाऊस देणारे मृग नक्षत्र लागून सात दिवस लोटले तरी, जमिनीवर अजूनही पावसाचा एक थेंबही पडला नाही. उलट तापमानामुळे उकाडा वाढला. २२ जून नव्या आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत आहे. वाहन उंदीर आहे. पूर्वीच मध्यम पावसाचे वाहन म्हणून त्याला ओळखले जाते. त्यामुळे कोल्ह्याची कुई $ $ कुई व उंदराच्या रूपाने पावसाच्या उच्छाद मांडेल का? याची प्रतीक्षा बळीराजाला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)