मधमाशांची परागीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका; संकलनातून मिळतो रोजगार
देवरी शब्द संदेश न्यूज, दि.१९
मधमाशाला सामाजिक कीटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परिसापेक्षा कमी नसतो. तर फलधारणेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पती पासून मिळत असले तरी ही मधमाशा यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वावर मधमाशांचे मोठे उपकार आहेत. मधासारखे अमृत निर्माण करणाऱ्या कीटकांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.
मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटकनाशके फवारणे, मोबाईल टावर उभारणे, मधमाशी विषयीचे अज्ञान पसरवणे, या सर्व कारणामुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे. पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेन या बाबी पेक्षा उत्पादनाकरिता वाढ हा महत्त्वाचा घटक मानून मधमाश्यांच्या पालनाला अग्रक्रम देणे महत्त्वाचे आहे. रोजगार निर्मितीला बाब असल्याने हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. फळे, भाजीपाला पिकांच्या परागी करण्यास मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्पादनात २५ ते ३५ टक्के एवढा मोठ्या प्रमाणावर वाढ होते. मधमाशी पालनाकडे पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्याचा कल वाढविण्याकरिता शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांना अनुदान सुद्धा दिले जाते.
मधमाशी ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे काम करते समूहाने जगत आदर्श जगणे माणसाला शिकवते दीर्घ कष्ट करता मदासारखा गोड पदार्थ निर्माण करते आपण सर्व मधमाशी वाचविण्याच्या पर्यायाने प्रयत्न करूया. संयुक्त राष्ट्र संघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर झाला. मधमाशांचे संवर्धन करण्यासह कीटकांचे संवर्धन करण्यासाठी याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते.
मधमाशांच्या प्रजाती
या मधमाशा पैकी भारतीय माशी आणि युरोपियन माशी पेटीत पाडता येतात. भारतीय माशी, युरोपियन माशी, आग्या माशी, लहान माशी आदी मधमाशांच्या प्रजाती आहे.
मध हे अमृतच!!
अगदी महिना दोन महिने शिळे झाले तरी अनेक खाद्यपदार्थ आपण खाऊ शकत नाही. मध मात्र ३००० वर्षे जुने असलेले आपण खाऊ शकतो. ही मधमाशांची किमया आहे. त्याचबरोबर ८०% परागीभवन मधमाशा कडून होते. जर मधमाशा संपल्या तर कोणत्याही झाडाला फळे लागणार नाहीत असे बोलल्या जात आहे.
