अरण्यऋषी व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांचे सोलापुरात निधन
शब्दसंदेश न्यूज, दि.१८
प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक अवघे जीवन वनविद्याचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यसंगी संशोधक व वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे सोलापुरात बुधवारी सायंकाळी निधन झाले.
दरम्यान, त्यांना नुकताच राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्धतशीर पुरस्कारान सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसापासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले.
