जादूटोण्याच्या भीतीपोटी युवकाकडून वृद्धाची हत्या! काही तासातच आरोपी अटकेत

Shabd Sandesh
0
      गोरेगाव तालुक्यातील हेटीटोला/पालेवाडा येथील घटना...
शब्दसंदेश न्यूज गोंदिया, दि.१८

दि. १७ जून २०२५ रोजी ३:०० वाजे दरम्यान मृतक आसाराम कांबळे (वय ६७) हा गावाजवळील जंगल परिसरात शेळ्या चारण्याकरिता गेले होते. सायं. ६:३० वाजे दरम्यान फक्त शेळ्या घरी परत आल्या. परंतु, मृतक आसाराम घरी परत न आल्याने, त्याने मृतकची पत्नी व गावातील लोक हे मृतक चा शोध घेण्याकरिता गावाजवळील जंगल भागात गेले असता हेटिटोला जंगल तलावाजवळ मृत अवस्थेत मिळून आला. त्यास अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून  कोणत्यातरी शस्त्राने डोक्यामागे मानेच्या वर वार करून गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केल्याने फिर्यादी हंसराज आसाराम कांबळे  राह. हेटीटोला पालेवाडा याचे तक्रारीवरून पोलीस ठाणे गोरेगाव येथे अपराध क्रमांक- ३८०/२०२५ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर खून प्रकरण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, गोंदिया गोरख भामरे, यांचे सूचनेप्रमाणे आणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांची ३ पथके  नेमण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुह्याच्या घटनास्थळी अत्यंत तत्परतेने भेट देऊन, गुन्ह्याची सखोल माहिती घेत घटना करुन पसार झालेल्या आरोपींची इत्यंभूत माहिती घटनास्थळ परिसरातील लोकांकडून गोळा करून अथक परिश्रम घेवून खुन करणारा आरोपीत इसम नामे, देवेंद्र उर्फ भुरु चुन्नीलाल ताराम, वय २४ वर्षे, रा. हेटी (पालेवाडा), ता.गोरेगांव, जि. गोंदिया ह. मु. हैद्राबाद AP यास मौजा हलबीटोला (गोरेगांव) येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले. खून प्रकरण गुन्हयाचे अनुषंगाने नमूद आरोपीस सखोल चौकशी विचारपूस केली असता, आरोपीने  सांगितले की, त्यास मृतकने जादुटोना केलेला आहे. त्यामुळे त्यास त्रास होत आहे अशा संशयावरून त्याने काल हैद्राबाद येथून गावी येऊन आसाराम कांबळे यास त्यांच्या डोक्याच्या मागे लोखंडी कु­हाडी ने मारून गंभीर जखमी करून जिवानिशी ठार केले व त्यानंतर तो हैद्राबाद येथे जाणेकरिता निघाला होता. अशी कबुली दिली आहे. 
आरोपीस पुढील तपास कामी रितसर गोरेगाव पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहेत. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनात गुन्ह्याचा पुढील अधिकचा तपास गोरेगाव  पोलीस करीत आहेत. 
पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे दिलेले निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा तत्परतेने शोध घेवून आरोपींना गुन्ह्यात जेरबंद करण्याची कामगीरी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम अहेरकर, सपोनी धिरज राजुरकर, पोउपनि शरद सैंदाने पोहवा राजेंद्र मिश्रा , पोहवा महेश मेहर, पोहवा विठ्ठल ठाकरे, पोहवा दिक्षितकुमार दमाहे, पोहवा प्रकाश गायधने, पोहवा इंद्रजित बिसेन, पोहवा सुबोधकुमार बिसेन, पो.शि. हंसराज भांडारकर, पो.शि. छगन विठ्ठले,  पो.शि.राकेश इंदुरकर, पो.शि. सुनिल डहाके, पो.शि. योगेश रहिले, पोहवा लक्ष्मण बंजार, चापोशि घनश्याम कुंभलवार, चापोशि राम खंडारे यांनी कामगिरी बजावली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)