शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.२०
चिचगड पोलीस ठाण्याच्या पथकाने खामखुर्रा येथील जंगल परिसरात तासपत्तीचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई केली.
या कारवाईत मोबाईल, रोख रक्कम व तासपत्ती असा एकूण २८ हजार ६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कैलास खासबागे व त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे आरोपी मोतीलाल कौशील, अविनाश नंदेश्वर, मुलचंद वाघाडे, लवकुश शेवता, कमलेश कुंजाम, इतवारी वाघाडे, राजपाल उईके व बाळकृष्ण शहारे सर्व राह.खामखुर्रा ता. देवरी हे १६ जून रोजी दुपारी ३:०० वाजता खामखुर्रा परिसरात पत्ते खेळत असताना पोलिसांनी पकडले. त्यांच्या अंग झळतीतून आणि स्थळावरून १४ नग मोबाईल किंमत १८ हजार तासपत्ती व रोख १० हजार ५० रुपये एकूण २८ हजार ६५ रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा अनन्वे गुन्हा दाखल केला.
